दुचाकीस्वार चोरटे सोन्याचे गंठन हिसकावून पसार

औरंगाबाद : साथी ऑनलाईन साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून सासूसोबत घराकडे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन दोन दुचाकीस्वार चोरटे हिसकावून पसार झाले. ही घटना ४ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुकुंदवाडी गावातील मुख्य प्रवेशव्दाराजवळ घडली. ननदेच्या साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने भारती संतोष गांगवे (२१, रा. गल्ली क्र. १, रोहिदासनगर, मुकुंदवाडी) या सासू […]

अधिक वाचा

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक पुढे ढकला

औरंगाबाद : साथी ऑनलाईन देशभरात कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला असून हा धोका पाहता औरंगाबाद महानगरपालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात याव्यात तसेच या कालावधीत कारभारासाठी प्रशासनाकडे देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समितीचे अॅड.महादेव अांधळे यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशभरात सध्या कोरोना व्हायरस या विषाणु आजाराची साथ निर्माण […]

अधिक वाचा

थकीत मालमत्ता कराच्या व्याज, दंडावर सवलत मोहीम तांत्रिक अडचणीत

औरंगाबाद : साथी ऑनलाईन महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निवासी मालमत्तांना थकीत करावरील व्याज व दंडात शंभर टक्के सवलत देण्याची घोषणा महापौरांनी केली होती. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने महिनाभरापूर्वी सुरू केली. मात्र कर भरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफटवेअरमधील तांत्रिक अडचणीमुळे खोळंबा झाला. त्यामुळे नागरिकांना केवळ 75 टक्के सवलत मिळत होती. त्यामुळे शंभर टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रभाग कार्यालयांत […]

अधिक वाचा

कोरोना व्हायरस: विमानतळावर प्रवाशांसाठी स्क्रिनिंग सेंटर

औरंगाबाद : साथी ऑनलाईन कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने अलर्ट जारी केल्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा सज्ज केली आहे. महापालिकेतर्फे २४ तास कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर देश-विदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी महापालिका-सिग्मा हॉस्पीटल-विमानतळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून विमानतळावर स्क्रिनिंग सेंटर सुरू केले आहे अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले […]

अधिक वाचा

येस बँकेच्या ग्राहकांसोबत त्यांची ऑनलाइन व्यवहाराची सेवा घेणाऱ्या छोट्या बँकांही अडचणीत

औरंगाबाद : प्रमोद अडसुळे  सातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने तसेच एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरल्याचे कारण यासाठी रिझर्व्ह बँकेने दिले आहे. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार […]

अधिक वाचा

नांदेड ते औरंगाबाद विशेष गाडी महिला कर्मचार्यांनीच चालविली

औरंगाबाद :  साथी ऑनलाईन नांदेड ते औरंगाबाद विशेष रेल्वे गाडी शुक्रवार दि. 06 मार्च रोजी महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनीच चालविली. महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर आयोजित उपक्रमाचे उपस्थित प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा पाहण्यासाठी  उपिंदर सिघ विभागीय रेल्वेव्यवस्थापक, हे स्वतः नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष उपस्थित होते. शुक्रवारी चालविण्यात आलेल्या गाडीमध्ये श्रीमती निधी सिंघ, वरिष्ठ लोको पायलट […]

अधिक वाचा

जालन्यातील स्टील कंपनीत जखमी झालेल्या तिघांचा औरंगाबादमधील खासगी रूग्णालयात मृत्यू

औरंंगाबाद : साथी ऑनलाईन जालना एमआयडीसी परिसरातील ओम साईराम स्टील कंपनीत झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तीन कामगारांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.६) पहाटे मृत्यू झाला. आतापर्यंत या घटनेत मृत पावलेल्यांची संख्या ७ वर गेली आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या आणखी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाकुमार अशोककुमार सिंह, अंकुकुमार […]

अधिक वाचा

अशी आहे अर्थसंकल्पातील खातेनिहाय तरतूद

1. प्राथमिक आरोग्यासाठी ५ हजार कोटी 2. सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार ६६८ कोटी 3.मृद आणि जलसंधारण विभागाकरता २ हजार ८१० कोटी 4. ग्रामपंचायतींसाठी १ हजार कोटींचा निधी, 5. मेट्रो प्रकल्पांसाठी १ हजार ६५७ कोटी 6. आदिवासी विकास विभागाला ८ हजार ८५३ कोटी 7. तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र मंडळासाठी ५ कोटी 8. महिला बालविकास विभागासाठी २ हजार […]

अधिक वाचा

महाविकास आघाडीचा महाअर्थसंकल्प : स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण; बळीराजाला दिले बळ

मुंबई । राज्याच्या डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा, जीएसटी परताव्यास होणारा विलंब यामुळे तिजोरीत झालेला खडखडाट, शेतकरी कर्जमाफीचे आव्हान, बेरोजगारी अशा आव्हानांनी बेजार झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विकासाच्या पथावर आणण्याचा संकल्प राज्यातील महाआघाडी सरकारने आज केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाआघाडी सरकारचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात मांडला. राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकार […]

अधिक वाचा