महापौरांनी रात्रीतून फिरवली जादूची कांडी;शहर बस सेवेच्या शुभारंभास सर्वच राजकीय पक्ष सहभागी

औरंगाबाद राजकारण

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे 

: मनपाच्या वतीने सुरु होत असलेल्या स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बस सेवेचा उदघानावरून मागील पाच दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्र्यांना डावलून कार्यक्रम होत असल्याने भाजपासह विरोधी पक्ष एमआयएमने बहिष्काराचे हत्यार उपसले होते. मात्र, रात्रीतून महापौर नंदकुमार घोडेले यांनी जादूची कांडी फिरवली आणि कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी भाजपाचे आ. अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे, माजी आ. किशनचंद तनवाणी, मनपातील गटनेते प्रमोद राठोड, वै.वि.मं. अध्यक्ष भागवत कराड, नगरसेवक दिलीप थोरात हे कार्यकर्त्यासह कार्यक्रमस्थळी दाखल झाले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाहून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, एमआयएमचे आ. इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते जमीर कादरी हे नगरसेवक कार्यकर्त्यासह कार्यक्रमास आल्याने उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मनपाच्या प्रशासनाने कार्यक्रमातून अंग काढून घेतले होते. मात्र, मनपाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. यामुळे नेमक्या रात्रीतून काय घडामोडी घडल्या याचीच चर्चा कार्यक्रमस्थळी सुरु होती. कार्यक्रमात या सर्वांना पाहून महापौरांसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला असेच म्हणावे लागेल. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, सेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, स्थायी समिती सभापती रेणूकदास वैद्य, सभागृह नेते विकास जैन यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *