जालन्यात कोरोना रुग्णसंख्या सहाशेच्या उंबरठ्यावर ! सकाळी २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

जालना ब्रेकिंग
Spread the love

कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश

मराठवाडा साथी न्यूज
जालना : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना
सुरू आहेत. मात्र, तरीही कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी ( दि.१) सकाळी आणखी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ५८० वर पोहोचली आहे.
जालना जिल्ह्यात आणि विशेष करून जालना शहरात गेल्या आठवडाभरपासून कोरोनाचा वेगाने वाढला आहे. मंगळवारी ( दि. ३० जून ) प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेल्या ८३ नमुण्यापैकी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर ४६ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच ७ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता सहाशे च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मंगळवारी आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १५ जणांचे बळी गेले आहेत. असे असले तरी कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. आतापर्यंत ३५१ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या २१४ जणांवर कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
जालना शहरातील
संभाजी नगर-१, जे पी सी बँक कॉलनी-१ , बुर्हान नगर-३, कैन्हाया नगर-१, MIDC -१, बालाजी नगर – १, महावीर चौक-१, साई नगर-१, दाना बाजार-१, कसबा जुना जालना -२, गुरु गोवा नगर-२, काद्राबाद -१, बागवान मजिद-१, निवांत हाँटेल मागे-१, विकास नगर -१, कालीकुर्ती-१, एकलेहरा ता. अंबड-१, दे.राजा जि. बुलढाणा-१, नरिमान नगर-१, नेरू रोड-१, भोकरदन २, रोहीलागड ता.अंबड-१, अंबर हाँटेल-१ असे एकूण २७ रुग्ण आहेत.