336 रुग्णांना दिली सुट्टी ; आज 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जालना ब्रेकिंग
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
जालना : एकीकडे जालन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर यशस्वी मात करून बरे होणाऱ्यांची संख्या मात्र दिलासादायक आहे. आतापर्यंत जालना जिल्ह्यात 336 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, आज सोमवारी ( दि. 29) 17 नवीन कोरोना बाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या 521 वर पोहोचली आहे.
जालना जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. परंतु, त्याच बरोबर कोरोनावर यशस्वी मात करून बरे होण्याचे प्रमाण देखील जिल्ह्यात अधिक आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून जाऊन त्याचा बाऊ करण्याची गरज नाही, हे या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजे. फक्त एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेऊन मास्कचा नियमित वापर करून आपण या विषाणूची लागण होण्यापासून स्वतः चा बचाव करू शकतो.
दरम्यान, सोमवारी सकाळी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. रविवारी ( दि. २८) प्रयोगशाळेकडे 50 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 4 अहवाल अजून प्रलंबित आहेत. रुग्णांची संख्या 521 झाली असली तरी यातील 336 जण कोरोना मुक्त झालेले असल्यामुळे सध्या फक्त 172 अॅक्टिव्ह रुग्णांवर कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
सोमवारी सकाळी आढळलेल्या 17 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जालना शहरातील 13, मानेपुरी 1,बदनापूर 1,जाफराबाद 1,परतूर 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.जालना शहरातील ढवलेशवर ,जागडेनगर,मंठा चौफुली,गोपालपुरा,RP रोड, मोदीखाना,बन्सीपुरा,मिशन हॉस्पिटल, बरवार गल्ली आणि रहेमान गंज येथील हे 13 रुग्ण आहेत.