जालन्यात कोरोनाचा उद्रेक ; ४२ जण पॉझिटिव्ह

जालना ब्रेकिंग
Spread the love

रुग्णांची संख्या पाचशे पार; जिल्हाधिकऱ्यांची आज दुपारी पत्रकार परिषद

मराठवाडा साथी न्यूज
जालना : अनलॉक केल्यापासून जालना शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. शनिवारी ( दि. २७) एकाच दिवशी जालन्यात कोरोना रुग्ण वाढीचा रेकॉर्ड ब्रेक झाला . त्यानंतर आज रविवारी ( दि. २८) सकाळी पुन्हा अत्यंत धक्कादायक अहवाल प्राप्त झाले आहेत. ११९ पैकी तब्बल ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ५०४ वर गेली आहे.दररोज वाढत असणारी रुग्ण संख्या ही जिल्ह्यासाठी अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
जालना जिल्ह्यात औरंगाबाद पाठोपाठ कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. जालना शहरात कोरोनाची साखळी वेगाने वाढत चालल्याचे दिसून आले आहे. आज सकाळी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालात सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील आहेत. यामध्ये क्रांती नगर-१, यशोदानगर-१, खडकपुरा-५, मंगळ बाजार -२, रहमागंज – १५, योगेश नगर-१, नगर पालिका च्या बाजुला -१, सुरज आपारमेंन्ट-१, दानाबाजार-१०, राजश्रीशाहु नगर-१ ,
संजोगनगर – १, नवीन जालन्यातील नलगल्ली – १, पानशेद्रा ता.जालना – १ ,भारज बु. ता. जाफराबाद – १ अशा एकूण ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, पॉझिटिव्ह ऋग्णांपैकी नगर पालिकेतील एका अधिकाऱ्यासह एक वाहन चालक आणि दोन खासगी डॉक्टरांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातून एकूण ३१७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.आतापर्यंत कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून यावर काही कठोर उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आज दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.