जालन्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक ; एकाच दिवशी ३७ जण पॉझिटिव्ह !

जालना ब्रेकिंग
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
जालना : कोरोना उद्रेक वाढतच चालला असून जालना जिल्ह्यात शनिवारी ( दि. २७) सकाळी पॉझिटिव्ह रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली. शुक्रवारी ( दि. २६) पाठवलेल्या १४७ नमुन्यांपैकी तब्बल ३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. आतापर्यंतच्या रुग्ण वाढीत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ४६२ वर पोहोचली आहे.
जालना जिल्ह्यात आता दररोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. शुक्रवारी १८ रुग्णांची भर पडल्यानंतर शनिवारी सकाळी यात तब्बल ३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. यामध्ये जालना शहरातील २३ , जाफराबाद टेंभुर्णी १२,भोकरदन १, परतूर तालुक्यातील वाटुर फाटा १ अशा ३७ रुग्णांचा समावेश आहे.शुक्रवारी वाढलेले १८ रुग्ण देखील जालना शहरातील होते. आज प्राप्त अहवालात सर्वाधिक २३ रुग्ण देखील जालना शहरातीलच आहेत.याबरोबरच कोरोना रुग्णांची संख्या ४२५ वरून ४६२ वर पोहोचली आहे. प्रयोगशाळेत पाठवलेल्या १४७ नमुन्या पैकी १०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर एका जणाचा अहवाल प्रलंबित आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १३ जणांचे बळी गेले आहेत.३०१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर १४८ रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.