जालना कोरोना @425 राखीव पोलीस दलाच्या 6 जवानांसह 18 जण पॉझिटिव्ह

जालना ब्रेकिंग
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
जालना : येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या 6 जवानांसह शहरातील 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतचा अहवाल आज शुक्रवारी ( दि. २६) सकाळी 8 वाजता प्राप्त झाला.या 18 नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 425 झाली आहे.

गुरुवारी ( दि.२५) जिल्ह्यात 407 कोरोना बाधित रुग्ण होते. त्यानंतर प्रयोगशाळेत 75 जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला. यात 57 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज आढळून आलेले सर्व रुग्ण जालना शहरातील असून नाथ बाबा गल्ली 2,राखीव पोलिस दल 6, मंगळ बाजार 4,कन्हैया नगर 2, सदर बाजार 1, नळगल्ली 1,आनंद नगर 1 खडक पुरा 1 या भागातील हे रुग्ण आहेत.

अनलॉक केल्यापासून जालना शहरातील गर्दी वाढत आहे. सुरक्षित अंतर , मास्कचा वापर याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी काही कठोर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने शहरात पी -1, पी – 2 ही पद्धत वापरली पाहिजे, अशी मागणी पुढे येत आहे.