जालना पालिकेतील स्वच्छता निरीक्षकासह टीबी हॉस्पिटलमधील दोघांना कोरोनाची बाधा

जालना
Spread the love

सकाळी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांची संख्या ४०७

मराठवाडा साथी न्यूज
जालना : कोरोना विषाणूची संक्रमण यात्रा जालना जिल्ह्यात आता एकापासून दुसऱ्याला आणि त्याच्यापासून तिसऱ्याला अशा पद्धतीने सुरू झाली आहे. बुधवारी ( दि. २४) १४ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांची संख्या ३९८ वर गेली होती. दरम्यान, आज गुरुवारी ( दि. २५) सकाळी प्राप्त झालेल्या ६१ अहवालात ९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. याबरोबरच कोरोना रुग्णांची संख्या चारशे पार म्हणजे ४०७ झाली आहे.

जालना नगर परिषद मध्ये कार्यरत असलेल्या एका स्वच्छता निरीक्षकासह जालना जिल्हा क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेले दोन कर्मचारी आणि जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरात असलेल्या निवसस्थानातील एका रुग्णाचा समावेश बाधित रुग्णांत आहे. दरम्यान, क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेले दोन्ही बाधित कर्मचारी हे औरंगाबाद येथील रोषणगेट आणि सुदर्शन नगर हडको येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे कर्मचारी औरंगाबाद येथून अप डाऊन करीत होते काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. असे असेल तर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांची पायमल्ली कर्मचारी करीत असल्याचे सिद्ध होईल.
जालना शहरातील हनुमान नगर १, १ ,सदर बाजार १,कालीकुर्ती १,वैभव कॉलनी१, जिल्हा रुग्णालय निवासस्थान १, जालना तालुक्यातील भाटेपुरी १, जाफराबाद तालुक्यातील भारज १ अशा नऊ जणांचा कोरोना बाधित रुग्णांत समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.