‘निसर्ग’ वादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज

आरोग्य मुंबई
Spread the love

मुंबई : सााथी ऑनलाईन
निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम
किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर,
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गजिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून
घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून
या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री यांचे ट्वीट
अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा धोका
लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे. कोकण किनारपट्टीवर
NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडू
नस्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी के ली जात
आहे. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून
घेतल्या आहेत. वादळाचा धोका असलेल्या भागातील
जिल्हाधिकारी यांनी चक्रीवादळ पुर्वतयारी व उपाययोजनेच्या
अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत बैठका घेतल्या.

Tagged