‘मिशन बिगेन अगेन’ तीन टप्प्यात हटणार निर्बंध

आरोग्य मुंबई
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य
सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली असून येत्या ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र लॉकडाऊन लागू करतानाच राज्य सरकारने ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता नागरिकांना जॉगिंग,
व्यायाम, सायकलींग करता येणार असून गार्डनमध्येही फिरता येणार आहे. तसेच इलेक्ट्रिशियन्स, गॅरेज आणि पेस्ट कंट्रोल आदी गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली
आहे. त्याशिवाय कंटेन्मेंट झोन वगळता सरकारी कार्यालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यसरकारने काही ठिकाणी मार्केट्स सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी हॉटेल, मॉल्स सुरू करण्यास सरकारने परवानगी दिलेली
नाही.
राज्याचे मुख्य सचिव अजोय  मेहतायांनी आज ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ३ जून, ५ जून आणि८ जूनपासून काही गोष्टींना सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ३ जूनपासून उद्यानात
जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही ग्रुप अॅक्टिव्हिटी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांना जवळपास प्रवास करण्यास
परवानगी देण्यात आली आहे. मात्र लांब प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खुल्या मैदानात गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Tagged