धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल सुरु होणार

देश-विदेश राजकारण
Spread the love

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

देशात 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्तकंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कटेंनमेंट झोनवगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्याने सुरु होणार आहेत.कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे. रात्री 9 वाजेपासूनसकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्युअसणार आहे. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

कटेंनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा
प्रशासनाला देण्यात आले आहेत. लॉकडाऊन 5 ला ‘अनलॉक 1’ असं नाव देण्यात आलं आहे. कटेंनमेंट झोनमध्ये केवळ
अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

Tagged