मद्यप्रेमींसाठी आता खुशखबर

देश-विदेश
Spread the love


बीड – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जाहीर केलेल्या पत्रकामध्ये जिल्ह्यातील वॉईनशॉप, देशीदारू दुकाने, बिअरशॉपी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोन आणि बफर झोनमधील दारू दुकाने मात्र बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. शहर आणि जिल्ह्यातील बिअरबार-परमीटरूम मात्र बंद राहणार आहेत. फक्त सीलबंद बाटलीतूनच मद्यविक्रीची परवानगी देण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले आहे. आणि परवानाधारक यांनाच खरेदी देखील करता येईल त्यासाठी वाईन शॉप किवा उत्पादनशुल्क विभागाकडून परवाना काढावा लागणार आहे .