छिन्नविछिन्न चेहरा झालेल्या युवकाचा मृत्यूदेह आढळला

ई पेपर बीड
Spread the love

छिन्नविछिन्न चेहरा झालेल्या युवकाचा मृत्यूदेह आढळल

अपघात की घातपात? परिसरात चर्चा

नेकनुर -नेकनुर येळंबघाट रोडवर चंद्राह हाॅटेल जवळ एका युवकाचा मृत्यूदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असावा. अपघातात ठार झालेल्या युवकाचा चेहरा छिन्नविछिन्न झालेला आहे. जवळ चप्पल किंवा कोणतीही वस्तू नाही. चेहरा छिन्नविछिन्न झाल्याने तो ओळखु येऊ शकत नाही. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे. मृत्युदेह ला जर कोणी ओळखत असेल तर नेकनुर पोलीसाशी संपर्क साधावा असे आवाहन नेकनुर, पोलीसनी केले आहे. घटनास्थळी नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे, पो. कॉ. खांडेकर, बामदाळे, युनुस बागवान, यांनी भेट देऊन मृतदेह नेकनुरच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.