धारूर घाटात सिमेंट घेवून जाणार ट्रक पलटी

ई पेपर बीड
Spread the love

किल्ले धारूर / प्रतिनिधी
आज सकाळी हैदराबादहून ६०० सिमेंट पोते घेवून बीड कडे जाणार ट्रक धारूर घाटात अवघड वळणावर पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रकमध्ये चालक व किनर होते. ट्रक पूर्णपणे चकाचुर झाला आहे. चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत.
आज सकाळी धारूर घाटातून बीड कडे ६०० पोते सिमेंट घेवून जात असताना ब्रेक निकामी झाल्याने सकाळी चार वाजता समोरून येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला वाचवण्यासाठी चालकांने प्रसंगावधान दाखवत गाडी डोंगर चढावर चढवली. यामुळे समोरून येणाऱ्या स्कार्पिओ जीप मधील ६ प्रवाशी यांचे प्राण वाचले आहेत. धारूर घाटात नेहमीच अपघात घडत आहेत. येथील रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.