जालन्यात आणखी दोन कोरोनाबाधित आढळले ; रुग्णसंख्या ५४ वर

जालना ब्रेकिंग
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा दोन जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ५४ वर गेली आहे.
जालना शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना देखील लागण होत आहे. आतापर्यंत रुग्णालयातील आठ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आज सकाळी आलेल्या अहवालात त्या रुग्णालयातील आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. तसेच जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथील एका व्यक्तीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका महिलेचा अहवाल देखील शुक्रवारी ( दि. २२) पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे टेंभुर्णी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.ही महिला तेथील क्वॉरंटाईन कक्षात होती. जालना जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५४ वर गेली आहे.

कोरोनाला ‘ खुले ‘ आवाहन !
राज्य सरकारने आता राज्यात तीन ऐवजी रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोनच झोन ठेवले आहे. त्यानुसार जालना नॉन रेडझोन मध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल, सलुन दुकाने वगळता सर्व दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी जालना शहरातील सर्व बाजारपेठ खुली झाल्यामुळे शहरात एकच गर्दी झाली. नागरिकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून गेले. कुणालाही कोरोनाचे गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. पोलिस प्रशासनाने कोणत्याही सूचना नागरिकांना दिल्या नाही. बहुतांश ठिकाणी तर पोलिस तैनात नव्हतेच. त्यामुळे शासनाने कोरोनाला जिल्ह्यात प्रसार करण्यासाठी ‘ खुले ‘ आवाहन दिले की काय, अशा संतप्त आणि खोचक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Tagged