ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सुविधा सुलभ झाली -चंदुलाल बियाणी

ई पेपर बीड
Spread the love

अंबाजोगाईच्या रुग्णालयास एमआयआर व व्हेंटीलेटर दिल्याने रुग्णांचे अचुक निदान होण्यास मदत;ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे रुग्ण सुविधा सुलभ-चंदुलाल बियाण

परळी – अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रलंबीत असलेला एमआयआर मशिन संदर्भात निविदा मागविण्यात आल्या असून लवकरच ती यंत्रणा उपलब्ध होणार आहे. तसेच कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी महत्वाची ठरणारी व्हेंटीलेटरची यंत्रणा ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून रुग्णांच्या अचुक निदानासाठी ना.धनंजय मुंडे यांनी केलेली शासकीय मदत अत्यंत उपयुक्त व रुग्ण उपचाराचा दर्जा वाढविण्यास कारणीभूत ठरेल असे मत परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी दिली. या बद्दल त्यांनी विशेष पत्राद्वारे ना.धनंजय मुंडे यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
वैद्यकीय सेवेत अत्यंत मुलभूत समजली जाणारी एमआयआर रुग्णांचे विविध आजारांचे अचुक निदान करणारे यंत्रणा ना.धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयास उपलब्ध होत आहे. मागील काही वर्षापासून प्रलंबीत असलेला हा प्रश्न तातडीने ना.धनंजय मुंडे यांनी सोडविला आहे. याबाबत निविदा मागविण्यात आल्या असून एमआयआर येत्या काळात उपब्लध होणार आहेत. परळी आरोग्य मित्रच्या वतीने आम्ही वैद्यकीय महाविद्यालयास पत्रकारांसह भेट दिली असता अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनीही एमआयआर मशिन असणे गरजेचे असल्याचे सांगीतले होते. त्याचवेळी आम्ही या बाबतचे निवेदन देऊन पाठपुरावाही केला होता. ना.धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीतून हा प्रश्न आता निकाली लागल्याने समाधान वाटत असल्याचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. दरम्यान कोरोना विषाणूच्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार करतांना व्हेंटीलेटरची गरज असते, ती सुद्धा ना.धनंजय मुंडे यांनी पुर्ण केली असून सोबतच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुविधेसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. याबाद्दल अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी आभार व्यक्त केले आहेत.