औरंगाबाद कोरोना@1218 दिवसभरात 32 रुग्णांची वाढ तर चार जणांचा मृत्यू

औरंगाबाद औरंगाबाद ब्रेकिंग
Spread the love

आतापर्यंत 570 रुग्ण कोरोनामुक्त तर 46 जणांचा मृत्यू

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे
जिल्ह्यात आज 32 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1218 झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन व खाजगी रुग्णालयात 18 मे रोजी एका अशा चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 570 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचेही सांगण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जयभीम नगर (5), गरम पाणी (2) रेहमानिया कॉलनी (2) कवरपल्ली, राजा बाजार (1), सुराणा नगर (1), मिल कॉर्नर (1) न्याय नगर (4), भवानी नगर, जुना मोंढा (2), रहीम नगर, जसवंतपुरा (1), पुंडलिक नगर, गल्ली नं. 10 (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (4), कटकट गेट (1), एन -2 सिडको (1), शिवाजी नगर (1), रोशन गेट (1), कैलास नगर (1),रवींद्र नगर, शहा बाजार (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 पुरूष आणि 14 महिला आहेत.

खाजगी रुग्णालयात एकाचा तर घाटीत तिघांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) औरंगाबाद शहरातील संजय नगरातील 41 वर्षीय महिला रुग्णाचा 21 मे रोजी दुपारी एक वाजता, बहादूरपुरा येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा 22 मे रोजी पहाटे 3.15 वाजता तर बायजीपुरा येथील 61 वर्षीय पुरुष रुग्णाचा 22 मे रोजी सकाळी पावणे बारा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. तर खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मकसूद कॉलनी रोशन गेट येथील 47 वर्षीय रुग्णाचा एका खाजगी रुग्णालयात 18 मे रोजी मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

सध्या घाटीमध्ये 75 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 62 रुग्णांची स्थिती सामान्य आणि 13 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे, असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे.

30 रुग्ण झाले कोरोनामुक्त

आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये महापालिकेच्या कोविड केअर सेंटर येथून 24 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये रामनगर 5, पुंडलिकनगर 4, एन-8 सिडको 1, प्रकाशनगर 1, नारेगाव 1, जुनाबाजार 4, हमालवाडी 1, चिकलठाणा 1, किलेअर्क 1 व अन्य भागातील 5 अशा 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर घाटी रुग्णालयातून भडकल गेट येथील 1 व इंदिरा नगरातील 1 अशा दोन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातून आज 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये रामनगर 2, भवानीनगर 1, बाबर कॉलनी 1 असे चार रुग्णांचा समावेश आहे. त्यानुसार शुक्रवारी दिवसभरात 30 रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 570 वर पोहोचला आहे.