भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर पलटी

ई पेपर बीड
Spread the love

धर्मापुरी जवळ ट्रॅक्टर पलटी ;अपघातात एकाचा मृत्यू 

परळी- तालुक्यातील धर्मापुरी येथील एस.के.जिनिंग जवळ अभिजित सत्यपाल राऊत यांच्या शेतातील माल रेणापूरला घेऊन जात असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने एकजण जागीच ठार तर तीन जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. परळी ते धर्मापुरी रोड वर धर्मापुरी गावाजवळ उतार असलेल्या रोडवर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर पलटी झाल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील शेतकरी अभिजीत सत्यपाल राऊत यांच्या शेतातील माल ट्रॅक्टरव्दारे रेनापुर येथे घेऊन जात असतांना अपघात झाला आहे. रेणापुर मध्ये सोयाबीन आणि हरभरा रेणापूरच घेऊन जात असताना ट्रॅक्टर (एम.एच.24, एल. 6404 )पलटी झाल्याने ट्रॅक्टर मधील मजूर ठार झाल्याची हृदयद्रावक घटना गल्ली आहे. तर एक जणास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. तर दोन किरकोळ जखमी आहेत. मयताचे नाव कृष्णा रखमाजी घुले वय 22 वर्ष रा.कौडगाव हुडा असे नाव आहे. कृष्णा घुले यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी बिट जमादार वसंत भताने यांनी भेट दिली.