धान्य घोटाळ्यात फिर्याद देणारे नायब तहसीलदार भंडारे हेच संशयाच्या भोवऱ्यात अडकले

ई पेपर बीड
Spread the love

धान्य घोटाळा प्रकरणी गेवराईचे नायब तहसीलदार पोलिसांच्या ताब्यात !

बीड -गेवराई येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यात फिर्याद देणारे नायब तहसीलदार भंडारे हेच संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांना चौकशीअंती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मस्के सारख्या धान्य माफियांना प्रशासनाचा आशिर्वाद होता हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे .
गेवराई येथे रेशनचा गहू,तांदूळ आणि साखर असा लाखो रुपयांचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी गोदामात दडवून ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते .या प्रकरणात भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचे निकटवर्तीय अरुण मस्के यांच्यासह त्यांच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. अरुण मस्के फरार असला तरी त्याच्या भावसह एका गोदामपालाला अटक करण्यात आली होती .
दरम्यान या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेने अनेकवेळा नायब तहसीलदार भंडारे यांची चौकशी केली होती,त्यांच्या चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत म्हणून अखेर शुक्रवारी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .या प्रकरणात तहसील प्रशासन हेच आरोपींना सहकार्य करत असल्याचे उघड झाले आहे,मात्र या आरोपीवर राजकीय वरदहस्त असणाऱ्यांचा यात सहभाग होता की नाही हे अद्याप समोर आलेले नाही,लवकरच यातील मुख्य सूत्रधार देखील गजाआड होईल अशी शक्यता पोलीस विभागाने व्यक्त केली आहे .