सिल्लोडमध्ये 65 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह

आरोग्य औरंगाबाद
Spread the love

सिल्लोड : साथी ऑनलाईन

महराष्ट्रातील ग्रामीण भागातही आता कोरोणाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

सिल्लोड शहरातील पासष्ट वर्षीय महिला कोरोनाबधित झाल्याचा अहवाल गुरुवार (ता.२१) रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला आहे. सिल्लोडमधील अब्दालशा नगर, हरी मस्जिद परिसरातील एका  पासष्ट वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
काही दिवसा पूर्वी त्या महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे  तिला एका खासगी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर काही दिवसां नंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यानंतर त्या महिलेचा  अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  ती महिला राहत असलेला  परिसर निर्जंतकीकरण करण्यात आले आहे.

Tagged