औरंगाबाद कोरोना बाराशे पार ! आणखी 26 रुग्णांची वाढ रुग्णसंख्या 1212 वर

औरंगाबाद औरंगाबाद ब्रेकिंग
Spread the love

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आणखी 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1212 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान, रोज सरासरी शहरात पन्नास ते साठ रुग्णांची भर पडत होती. मात्र, आज रुग्णसंख्या नेहमीपेक्षा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जयभीम नगर (5), गरम पाणी (2) रेहमानिया कॉलनी (2) कवरपल्ली, राजा बाजार (1), सुराणा नगर (1), मिल कॉर्नर (1) न्याय नगर (4), भवानी नगर, जुना मोंढा (2), रहीम नगर, जसवंतपुरा (1), पुंडलिक नगर, गल्ली नं. 10 (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (3) एन -2 ‍सिडको (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरूष आणि 10 महिला आहेत.

Tagged