हे आहेत मिठपाण्याचे फायदे

आरोग्य औरंगाबाद
Spread the love

मिठाच्या पाण्याने मलाशयाची स्वच्छता होते. त्यासाठी आपल्याला रोजसकाळी पाण्यामध्येमीठ घालून प्यायचे आहे. हा उपाय केल्यास आरोग्यासाठी हानीकारक आजार जसे मधुमेह आणि स्थूलपणा यांच्यापासून बचाव करू शकता. फक्त मधुमेहच नव्हे तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपण वाचू शकतो. काळ्या मिठाचे म्हणजेच सैंधव मिठामध्ये असलेली 80 हून जास्तखनिजे शरीर आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. कसे तयार करायचे हे पाणी पाहूया.
एक ग्लास कोमट पाण्यात एक छोटा चमचा काळे मीठ घालून ते चांगले विरघळवून घ्यावे. हे पाणी गुणकारी पेय आहे. याचे सेवन केल्याने आरोग्यवर्धक फायदे होतील.  या पाण्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतील.

त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या, डागांपासून सुटका होईल. कारण मिठाच्यापाण्यात क्रेमिया असते, ज्यामुळे त्वचा रोगांशी लढून त्वचा उजळते.

पचन तंत्र – मीठपाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणाऱ्या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि प्रथिने पचवण्याचेकामकरतात. त्यांना पचवण्यास लाळेची मदत होते. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्यामध्ये अन्न पचनास आवश्यक एन्झाईम्स निर्माण होतात.
नैसर्गिक जीवाणूविरोधी – मीठपाण्यात अनेक खनिजेअसतातच पण हे मीठ पाणी नैसर्गिक जीवाणूविरोधी घटक म्हणून काम करते. शरीरातील जीवघेण्या आजार पसरवणाऱ्या जीवाणूंना मारण्याचे काम ते करते आणि
आरोग्य चांगले राहाते.
हाडांची मजबुती – वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्या शरीरातील खनिजे आणि कॅल्शिअम कमी होत जाते आणि हाडे कमजोर होऊ लागतात. त्यामुळे हाडे तुटूही शकतात. अशा परिस्थितीत मीठ पाणी प्यायल्याने हाडातील खनिजांची पूर्तता होऊन हाडे मजबूत होतात. त्यासाठी रोज नियमितपणे ह्या पाण्याचे सेवन करावे.
स्नायूंची मजबूती – काळे मीठ कोमट पाण्यात मिसळून रोज प्यायल्यास शरीरातील पोटॅशिअम कमी होते. त्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि आरोग्य चांगले राहते.

Tagged