आजपासून ग्रामीण भागात प्रवाशांना घेऊन धावणार लालपरी

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन वाढविण्यात आला आहे हा लॉकडाउनचा चौथा टप्पा असुन
या टप्प्यात अनेक नियम व संचारबंदी शिथील करण्यात आली असून काही सेवा देखील सुरु करण्यात आल्या. त्यात एसटीच्या बस सेवेचा ही समावेशआहे.लॉकडाउन मुळे गेली दोन महिने थांबलेली लालपरीची चाके पुन्हाफिरू लागणार आहे. शुक्रवारपासुन (दि.२२) जिल्ह्याच्या अंतर्गत ग्रामीण
भागांत एसटीची लालपरी आपली सेवा देण्यास सज्ज झाली आहे. यात पैठण, वैजापूर, कन्नड, गंगापुर व सोयगाव
आगारांचा समावेश आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे गेली दोन महिने लालपरीची चाके थांबली होती.विविध राज्यांतील कामगारांना सीमेपर्यंत
सोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून लालपरी या बस मधून सोडण्यात येत आहे.त्यातच लॉकडाउनच्या
चौथ्या टप्प्यात केंद्र व राज्य शासनाने शिथीलता आणली.त्यानुसार आजपासुन जिल्हाअंतर्गत ग्रामीण भागांत लालपरीची बस सेवा सुरू केली असुन यात पैठण आगारातून पाचोड, बिडकीन व गंगापुर येथे २८फेऱ्या  होणार आहेत.
सिल्लोड आगारातून कन्नड, पळशी, वांगी व शिवना येथे ४४ फेऱ्या, वैजापूर आगारातून कन्नड, गंगापुर,
लासुर स्टेशन येथे ३२ फेऱ्या , कन्नड आगारातून सिल्लोड, वैजापुर, गंगापुर व वडनेर येथे ३४ फेऱ्या  तर गंगापूर
आगारातून कन्नड व वैजापुर येथे २४ फेऱ्या  तसेच सोयगाव आगारात सिल्लोड, नागद व गोलेगाव येथे १६ फेऱ्या अशा एकुण या सहा आगारा अंतर्गत १७८ फेऱ्या असणार आहेत.
विशेष म्हणजे बससेवेत सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करुन पन्नास टक्केप्रवाशांची वाहतूक करण्यात येणार
आहे.अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

Tagged