गुरुवारी राज्यात 1408 रुग्णांना डिस्चार्ज : २३४५ नवे कोरोना रुग्ण, ६४ मृत्यू, संख्येने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा

आरोग्य मुंबई
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

गुरुवारी १४०८ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ११ हजार ७२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २३४५ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे. २४ तासांमध्ये कोरोनाची बाधा होऊन ६४ मृत्यू झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या आता १४५४ झाली आहे. मुंबईतली रुग्णसंख्या २२ हजार ५०० इतकी झाली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत. राज्यात ६४ रुग्णांचा कोरोनाची बाधा
होऊन गेल्या २४ तासात मृत्यू झाला. त्यापैकी मुंबईत
४१, मालेगावात ९, पुण्यात ७, औरंगाबादमध्ये ३, नवी
मुंबईत २, पिंपरी चिंचवडमध्ये १ तर सोलापूरमध्ये १
मृत्यू झाला आहे.
२४ तासात जे ६४ मृत्यू झाले त्यामध्ये ३६ पुरुष
आणि २८ महिलांचा समावेश होता. या मृत्यूंपैकी ६०
किंवा त्यावरील वयाचे ३१ रुग्ण होते. तर २९ रुग्ण
हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. ४ रुग्ण ४० वर्षे
वयापेक्षा कमी वयाचे होते. मृत्यू झालेल्या ६४ रुग्णांपैकी
३८ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे
गंभीर आजार आढळून आले. कोरोनामुळे महाराष्ट्रात
झालेल्या मृत्यूंची आत्तापर्यंतची संख्या १४५४ झाली
आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार
७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे नमुने
कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर ४१ हजार ६४२
जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ४
लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाइन तर २६
हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Tagged