राज्यात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णसंख्या ३९,२९७

आरोग्य मुंबई
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

कोरोनामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती अजून कायम असल्याचे चित्र आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे, तर दसरीकडे कोरोना ु वर
मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासा देणारी आहे. राज्यात बुधवारी २ हजार २५० रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ३९ हजार २९७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन पुन्हा घरी परतले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

Tagged