शासन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये अर्थसाह्य

देश-विदेश
Spread the love

बीड – शासनाने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगरांसाठी प्रत्येकी २ हजार रूपये अर्थसाह्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे कामगार आधिकरी एस.पी.राजपूत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

संपूर्ण देश व महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोविंड १९ विषाणूच्या प्रधूर्भामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उधवली असल्याने जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील व्यवसाय व कामगार कर्मचार्यांवर आर्थिक परिणाम झाला आहे. बांधकाम कामगारांना या अर्थ सह्यामुळे दिला दिला असून त्यानुसार जिल्यातील नोंदणी व नूतनीकरण जीवित (सक्रिय) असलेल्या बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रस्फर अर्थात डिबीटी पद्धतीने २ हजार रूपे आर्थसाह्य जमा करण्यात येणार आहे. जिल्हा कामगार कार्यालया मार्फत आज पर्यंत २४ हजार १८१ इतक्या बांधकाम कामगारां यादी मंडळाच्या मुंबई मुख्यालयात पाठविण्यात आली आहे. उर्वरित यादी पाठविण्याचे काम सुरू आहे. या अर्थसह्यासा्ठी कुठलाही अर्ज भरण्याची अथवा कागदपत्र या कार्यालयात जमा करण्याची, कुठल्याही अनधिकृत व्यक्तीस भेटेण्याची आवश्यकात नाही. दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीच्या भूलथापांना बळी न पडता त्यांची संभंदित पोलीस स्टेशनला तक्रार करावी या अर्थसह्याची रक्कम परस्पर बँक खात्यात जमा होणार असल्याने चौकशी करता कार्यालयात गर्दी करू नये आणि लाॅकडाऊन नियमाचे पालन करावे अशा सूचना कामगार अधिकारी यांनी दिल्या आहेत.