दिलासादायक ; SRPF च्या 67 जवानांसह 110 जणांची कोरोनावर मात : ७ जवानांवर उपचार सुरू, औरंगाबादेत आतापर्यंत 445 रुग्ण कोरोनामुक्त

आरोग्य औरंगाबाद
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

मालेगाव येथून कोरोनाच्या बंदोबस्तावरुन ६ मे रोजी शहरात परतलेल्याराज्य राखीव बलातील ९३ जवानांपैकी ७४ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून या जवानांना सातारा परिसरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहातठेवण्यात आले होते. मंगळवारी दुपारी ७४ जवानांपैकी ६७ जवानांची कोरोनामुक्त झाले आहेत. याच दिवशी तब्बल 110 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 445 एवढी झाली आहे.राज्य राखीव बलाच्याएका तुकडीला २३ मार्च रोजी मालेगावात बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्येचार अधिकारी व जवान असा ९७ जणांचा समावेश होता. ४५ दिवसांची मुदत संपल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना परतबोलावण्यात आले होते. तत्पुर्वी त्यांची मालेगावात आरोग्यतपासणी करण्यात आली होती. अधिकारी व जवानांना
त्रास नसल्याने परवानगी घेऊन त्यांना औरंगाबादकडेबोलावण्यात आले होते. ६ मे रोजी शहरात दाखल झालेल्यातुकडीतील कर्मचाऱ्यांची शस्त्रे व वाहने सॅनिटाईज करण्यात आली होती. त्यानंतर ना श्रेयस इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वसतीगृहातक्वारंटाईन करण्यात आले होते. यादरम्यान, महापालिका
आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी
घेतले होते. त्यातील ७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
७ जवानांवर उपचार सुरू, औरंगाबादेत आतापर्यंत 445 रुग्ण कोरोनामुक्त

Tagged