मराठवाडा साथी व गोदावरी अकॅडमी तर्फे आज १२ व्यक्तीना किराणा किटचे वाटप

अहमदनगर आरोग्य
Spread the love

अहमदनगर – साथी ऑनलाईन                       देणगीदारांपेक्षा मदत मागणाऱ्यांची संख्या खूपच जास्त असल्यामुळे वाटपातील अडचणी वाढल्या असल्याची माहिती गोदावरी अकॅडमी चे अध्यक्ष बाजीराव खांदवे यांनी दिली.

ज्यांच्यापर्यंत शासनाची मदत पोहचत नाही, अश्या मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत मदत पोहचवणे हा आमचा उद्देश होता. पण होतेच काय ज्याला मदत दिली जाते तो ही माहिती अत्यंत वेगाने सर्वत्र पोहोचतेय,परिणामी वाटप करणे अवघड बनले आहे, किटची संख्या मर्यादित असल्यामुळे शहानिशा करूनच वाटप करण्यात येत आहे. सरसकट वाटपात मर्यादा आहेत, कृपया समजून घ्यावे ही अपेक्षा, आज देणगीदार फक्त १२ च मिळालेले आहेत, त्यामुळे मदत मागणार्यांना दुकानचा पत्ता व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठवला जाईल, त्या ठिकाणाहून त्यांना मेसेज दाखवून किराणा किट देन्यात येईल. कृपया सर्वानी याची नोंद घ्यावी. आजच्या १२ व्यक्तीला मेसेज पाठवण्यात आले आहेत.

मराठवाडा साथी व गोदावरी अकॅडमी किराणा वाटपासाठी आजचे देणगीदार
१ – डॉ. वसंत कटारिया अहमदनगर
– ५ किट
२- मुख्याध्यापक श्री.अशोक सुर्यवंशी
नूतन विद्यालय मिरजगाव
३ – डॉ . महेश कोकाटे – चिचोंडी पाटील
२ किट

Tagged