1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार

देश-विदेश
Spread the love

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी अनेक नागरिक अडकले आहे. या सर्वांनासाठीदिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ‘ट्विटरवरून दिली आहे.येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत, याबाबतचीही माहिती लवकरच दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी सांगितले.