आतापर्यंत केलेल्या मेहनतीची आज कठोर परीक्षा – जिल्हाधिकारी

ई पेपर बीड
Spread the love

 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे व्हिडिओद्वारे बीड जिल्हावासीयांना आवाहन माहिती लपाविनाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

बीड – गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्हा कोरोना या अदृश्य शत्रुशी यशस्वी लढा देत आला आहे. आजपर्यंत केलेल्या मेहनतीची कठोर परिक्षा असल्याने जिल्हा बाहेरुन आलेल्या व्यक्तीची प्रशासनाला माहिती दया. ग्रामीण भागात सरपंच, तलाठीसह अन्य कर्मचार्‍यांना तर शहरी भागात
नियुक्त केलेल्या लोकापर्यंत ती माहिती पोहस्त करा. बाहेरुन आलेल्यांनी घरातच क्वारंटाईन रहावं असं सांगत कुठल्याही गावाने स्वतः नियम न बनवता ग्राम दक्षता समितीने जे नियम घालून दिले आहे तेच नियम लागू करावेत असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगून, विनापरवाना येणार्‍या लोकांनो स्वतःसह नातेवाईक आणि गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात घालू नका. बाहेरुन आला असाल तर समोर या. आजपर्यंत केलेल्या मेहनतीची कठोर परिक्षा असल्याने घरातच रहा, सुरक्षीत रहा, अफवा पसरु नका, जिल्हा प्रशासनाकडून
आलेल्या सुचनाचं पालन करा असे आवाहन एका व्हिडीओद्वारे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
दोन महिने कडेकोट लॉकडाऊन पाळून कोरोना सारख्या अदृश्य शत्रुला जिल्ह्यात डेरेदाखल होऊ न देणार्‍या बीड जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील जनतेसमोर रेड, कन्टेंमेंट, हॉटस्पॉट झोनमधून येणार्‍या लोकांसोबत कोरोना
येतो हे आव्हान असून जिल्ह्यात याबाबत भीतीदाय वातावरण आहे. आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हावासियांना व्हिडिओद्वारे
मार्गदर्शन करताना म्हटले आहे की, ‘बाहेरून आलेल्या व्यक्तीची प्रशासनाला तात्काळ माहिती द्या, ग्रामीण भागात जे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांची माहिती ग्रामसेवक, तलाठी यासह अन्य प्रशासनातील व्यक्तींना दिली गेली
पाहिजे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन जे नियम बनवते त्याचं पालन ग्रामीण
भागाने करावे, काही गावांमध्ये स्वतंत्र नियम बनवले जात आहेत. परंतु
ग्राम दक्षता समिती जे ठरवेल तेच नियम गावाला लागू असल्याचे सांगत
बाहेरून आलेल्या व्यक्तीला घरातच क्वारंटाईन करा, त्याचे कपडे,
खाण्यापिण्याचे साधन हे वेगळे ठेवा. अशा सूचना देत राहूल रेखावार यांनी
होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी नियम पाळावेत, असे म्हणत हे लोक नियम पाळत नसतील तर लोकांनी प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी, जेणे करून होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीला नियम पाळणे बांधील करावे लागेल. राज्य शासनाच्या धोरणानुसार बाहेर जिल्ह्यातून येणार्‍या लोकांना परवानगी दिली जात आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर बाहेरून लोक जिल्ह्यात डेरेदाखल झाले आहेत. काही लोक विनापरवाना येत आहेत. अशा लोकांना जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे की, स्वत:सह नातेवाईकांचा आणि गावकर्‍यांचा जीव धोक्यात घालू नका, बाहेरून आला असाल तर प्रशासनासमोर या, तपासणी करा.
सकाळी ७:०० ते दुपारी २:०० या संचारबंदी शिथिलतेच्या कार्यकाळात दुकानांवर गर्दी होत आहे, ती गर्दी टाळण्याबाबतही जिल्हाधिकार्‍यांनी जनतेसह व्यवसायिकांना आवाहन केले आहे. त्याचबरोबर अफवांवर विश्‍वास ठेवू नका, जिल्हा प्रशासन जे काही अधिकृत आदेश काढील तोच खरा माना म्हणत, आजपर्यंत केलेल्या मेहनतीची ही कठोर परिक्षा असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले.