औरंगाबादेत 21 मे पासून असे असणार लॉकडाऊन : मनपा आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद औरंगाबाद ब्रेकिंग
Spread the love

औरंगाबाद / प्रमोद अडसुळे

शहरात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला कडक लॉकडाऊन बुधवारी (दि.20) मध्यरात्री संपत आहे. त्यानुसार आता महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिकुमार पांडेय यांनी 21 ते 31 मे या लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यासाठी गुरूवार दि.21 मे पासून सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यामध्ये अन्नाधान्य, किराणा, भाजीपाला, फळे, दुध विक्रीची दुकाने सुरू राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात गुरूवारी दि.14 मध्यरात्रीपासून बुधवारी दि.20 मध्यरात्रीपर्यंत शहरात कडक लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. सहा दिववसांच्या या कडक लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात येईल, असा विश्‍वास पालिका आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाला आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वयेच हा कडक लॉकडाऊन आमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो आता बुधवारी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने वाढविलेल्या 31 मेपर्यंतच्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी केंद्रांच्या सुचनेनुसार सुधारित आदेश जारी केले आहे. या आदेशानुसार शहरात 21 ते 31 मेपर्यंत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍या आस्थापना खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या काळात सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत या सहा तासांच्या वेळात शहरात अन्नधान्य, भाजीपाला, फळे, किराणा सामान विक्री करणारे दुकाने उघडी राहतील. हातगाड्यांनाही परवागनी आहे. मात्र, यासाठी नियमनाचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टनसिंग ठेवणे, तोंडाला मास्क, स्यानिटायझरचा वापर, दुकानदारांनी साफ सफाई-स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासह उपचाराच्या अत्यावश्यक सेवांना जसे की मेडिकल स्टोअर्स, औषध निर्मितीचे उद्योग या आस्थापनांना परवानगी कायम आहे.

Tagged