औरंगाबाद कोरोना@1073 आणखी 51 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद औरंगाबाद ब्रेकिंग
Spread the love

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नित्याने नवनवीन वसाहतीत कोरोनाचा शिरकाव होत आहे. आज मंगळवारी सकाळी आणखी 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), जटवाडा रोड (1), हिमायत बाग (1), किराडपुरा (4), पुंडलिक नगर (1), मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), जयभीम नगर (1), संजय नगर (1), रहिम नगर (1), कैलास नगर (1), गादल नगर (1), सादात नगर, गल्ली नं. 6 (4), शिवनेरी कॉलनी (1), विधिया नगर, सेव्हन हिल (1), गल्ली नं. 25, बायजीपुरा (4), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (1), मकसूद कॉलनी (1), जाधववाडी (1), गल्ली नं. 23, बायजीपुरा (2), गल्ली नं. 3, बायजीपुरा (1), सातारा गाव (3), आदर्श कॉलनी, गारखेडा (3), गारखेडा परिसर (1), मित्र नगर (1), मिल कॉर्नर(1), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (1), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (1) अन्य (4) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे.

Tagged