शपथविधीसाठी आमदार पडळकर चक्क धनगरी पेहरावात विधानभवनात दाखल

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

कोरोनाचे संकट असताना याची संपूर्ण खबरदारी घेत मुख्यमंत्र्यांसह हे ९ आमदार विधानभवनात उपस्थित होते. यावेळीसर्व आमदारांनी तोंडावर मास्क तर हातात ग्लोज घातल्याचे चित्र होते. सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी. शपथविधीसाठी आमदार पडळकर चक्क धनगरी पेहरावात विधानभवनात दाखल झाले. त्यांनी खादीचे कपडे परिधान केले असले तरी, डोक्यावर फेटा, खांद्यावर घोंगडं तर हातात काठी आणि तोंडाला मास्क असा पेहराव परिधान केला होता. क्षणभर पडळकर यांना कोणीओळखलेच नाही. त्यानंतर त्यांनी थेट विधानभवन गाठले. आजच्या दिवसाचे हिरो ठरले ते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर.च्या धनगरी पेहरावावरून अनेक चर्चाहोत्या. आगामी काळात ते धनगर समाजाच्याआरक्षणासाठी आक्रमक लढा देतील असे त्यांच्या कार्यकर्ते सांगत होते. पडळकर यांनीबारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.पडळकर यांना मोठ्या प्रमाणात धनगर समाजाची मते मिळतील, अशी आशा भाजपला होती मात्र अजित पवार बारामतीमधून विक्रमी मतांनी विजयी झाले. हा सर्व इतिहास पाहून भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. भाजपचीसत्ता असताना धनगर समाजाला न्याय देता आला नाही, मात्र त्यांनी पडळकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाचे नेतृत्व विधान परिषदेत पाठवले आहे. भविष्यात पडळकर हे समाजाला न्यायदेण्यासाठी जोमाने काम करतील, असे त्यांच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.

Tagged