मुख्यमंत्र्यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित ९ आमदारांचा शपथविधी सोहळा सोमवारी पार पडला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सर्व आमदारांना शपथ दिली.  कोरोनाचे संकट असताना
याची संपूर्ण खबरदारी घेत मुख्यमंत्र्यांसह हे ९ आमदार विधानभवनात उपस्थित होते. यावेळीसर्व आमदारांनी तोंडावर मास्क तर हातात ग्लोज घातल्याचे चित्र होते. .आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्येमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रविण प्रभाकरराव दटके, गोपिचंद कुंडलिक पडळकर, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेशधोंडीराम राठोड यांचा समावेश होता.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषी मंत्री दादाजी भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे यांच्यासह पडळकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tagged