मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर, १८ मे रोजी शपथविधी

मुंबई राजकारण
Spread the love

मुंबई : साथी ऑनलाईन

विधान परिषदेच्या ९ जागांवर येत्या २१  मे रोजी निवडणूक होणार होती. यासाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ९ जणांनी अर्ज भरला होता. गुरुवारी या ९ जागांवर निवड  करण्यात आली. काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. महाविकास
आघाडीने ५, तर भाजपाने चौघांना उमेदवारी दिली. तसेच अन्य डमी उमेदवारांनी अर्जमाघारी घेतल्याने उद्धव ठाकरेंसह ९ जणांची आमदारकी घोषित करण्यात आली.काँग्रेसचे राजेश राठोड, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर भाजपाचे
रमेश कराड, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रणजीत सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेचे सदस्यत्व जाहीर
करण्यात आले आहे. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्याएकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा
अखेरचा दिवस होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भाजप), संदीपसुरेश लेले (भाजप), किरण जगन्नाथ
पावसकर (राष्ट्रवादी), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी) या चार उमेदवारांनी दि.१२ रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले होते. दरम्यान, १८ मे रोजी सर्व नवनियुक्तसदस्य विधान परिषद सभापतींच्या उपस्थिती विधान परिषद सदस्यत्त्वाची शपथ घेणार असल्या  माहि ती आहे.

Tagged