पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या स्वावलंबी भारत योजना पॅकेजमधील या आहेत महत्वाच्या घोषणा

अर्थसत्ता देश-विदेश
Spread the love

महत्त्वाच्या घोषणा :
‹ 18 हजार कोटीचा इन्कम टॅक्स देणाऱ्यांना रिफं ड देण्यात येणार आहे.

 कुटीर लघु उद्योगासाठी सहा योजना. २ पीएफ, १ डिस्कॉम,
१ कॉन्ट्रॅक्टर.

 एमएसएमईसाठी कर्ज पुरविण्यासाठी तीन लाख कोटी.

 हे कर्ज १०० कोटींच्या व्यवहार असणाऱ्या कं पन्यांना
देण्यात येणार आहे. यासाठी १२ महिन्यांचा ईएमआय दिलासा
देणार आहे.

 ४५ लाख उद्योगांना याचा फायदा होणार आहे.

अडचणीतील एमएसएमईना २०००० कोटींचे पॅकेज. यामध्ये २ लाखाहून अधिक उद्योगांना फायदा होईल.

 जे मध्यम, सुक्ष्म लघू उद्योग चांगले काम करत आहेत. त्यांना विस्तार करायचे आहे. त्यांच्यासाठी फं ड देण्यात येणार आहे. यासाठी ५०००० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

 १ कोटींची गुंतवणूक असली तरीही मायक्रो युनिटचे लाभ मिळतील. हे नियम आता बदलण्यात आले आहेत. सेवा क्षेत्रालाही याचा लाभ मिळाला आहे.

 पाचव्या पावलामध्ये सरकारी टेंडर जी २०० कोटींपेक्षा कमी आहेत. त्यांना जागतिक पातळीवरील कं पन्या भरू शकणार नाहीत. ही टेंडर एएसएमई भरू शकणार आहेत. मेक इन इंडियामधून हा नियम बदलला आहे. कारण या जागतिक कं पन्यांमुळे स्थानिक कं पन्या मागे राहत होत्या.

 एमएसएमईंसाठी ई कॉमर्समध्ये सहभाग
आणि सार्वजनिक केंद्र उपक्रमात ज्या एमएसएमईचे पैसे अडकलेले आहेत त्यांना येत्या ४५ दिवसांत ते पैसे दिले जातील.

Tagged