मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज – निर्मला सीतारामन

अर्थसत्ता देश-विदेश
Spread the love

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

स्वावलंबी भारत योजनेची ही इमारत पाच  खांबावर उभी राहील. पहिला खांब अर्थव्यवस्था. दुसरा  खांब इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा  खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारीत, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी, अशी घोषणा  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या स्वावलंबी भारत योजना पॅकेजच्या
पहिल्या भागाची माहिती अर्थमंत्री  निर्मलासीतारामन यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
केली होती. पुढील तीन दिवस या पॅकेजची माहिती देण्यात आली.देशाच्या विकासासाठी हे पॅकेज आहे. देशातील गरीब,
स्थलांतरीत लोकांसाठी डीबीटी एक चांगली सोय ठरली आहे. त्यांना थेट मदत मिळत आहे. लोकल ब्रँडना ग्लोबल बनविण्यात येणार आहे. अनेक अधिकारी, तज्ज्ञ, मंत्रालयांशी पंतप्रधानांनी चर्चा करून ही योजना घोषित केली आहे. १७५ गिगावॉट सोलार एनर्जी, जनधन सारख्या योजना स्वावलंबी बनण्यासाठी पाया ठरणार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जमीन (Land), कामगार (Labor), Liquidity आणि कायदे (Law) या विषयांवर
लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले.लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात अर्थमंत्र्यांनी १.७ लाख कोटींचे पॅकेज दिले. ईएमआयपासून दिलासा दिला. आरबीआयला त्यावर अंमल करण्यास सांगितले. संकटकाळात भारताने विविध देशांना औषधं पुरवली, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत, आयुष्मान
यांचा फायदा गरिबांना मोठ्या प्रमाणात झाला, असे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. या आधी सीतारामन यांनी आधीच्या पॅकेजमधून काय करण्यात आले याची माहिती दिली. गरीब कल्याण पॅकेजमधून 52 हजार करोड डीबीटी, ४०००० कोटी बँकांमध्ये हस्तांतरीत करण्यात आल्याचे सांगितले.

Tagged