कार पुलावरून कोसळली; 5 जणांचा अपघातात जागीच मृत्यू

लातूर
Spread the love

लातुरमध्ये एक भीषण अपघात झाला असून यात पाच जण जागीच ठार झाले आहेत. भरधाव वेगातील कार लातूरकडे येत असताना मुरुड अकोला पाटीजवळ अपघातग्रस्त झाली. पुलावरुन खाली कोसळल्यामुळे कारमधील पाचजण जागीच ठार झाले. दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालूक्यातील मौजे डिकसळ येथील सातजण सोमवारी लातूर शहराजवळील 12 नंबर पाटीवर येत होते. हे सर्वजण कारने लातूरकडे विवाहासाठी येत होते. मारुती इर्टिगा (क्रमांक एम एच 05 बीजे 0680) या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. या मुळे अनियंत्रीत झालेली कार मुरुडअकोला पाटीजवळ असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली. उंचावरून कार खाली पडल्याने कारचा चक्काचूर झालेला होता. या अपघातात घटनास्थळी पाचजणांचा मृत्यू झाला. पाचही जणांची ओळख पटलेली आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
अपघातातील मृतांची नावे पुढील प्रमाणे –
परमेश्वर ज्योतीबा अंबीरकर (वय 21), ज्ञानेश्वर बब्रुवान खंदारे (वय 26), जगन्नाथ चंद्रकांत पवार (वय 30, तिघेही राहणार डिकसळ ता. कळंब) गणेश सोमासे (वय 32) आणि जरीचंद (नाना) हरिभाऊ शिंदे.
जखमी रग्णांची नावे – दत्ता अंगद जाधव (वय 28), श्रीकांत हणमंत अंबीटवार (वय 28).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *