औरंगाबाद : समतानगरात पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 38 वर

औरंगाबाद देश-विदेश
Spread the love

 

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे
शहरात कोरोना विषाणूची बाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने धोका अद्यापही कायम आहे. समता नगरातील दोघा जणांची कोविड चाचणी मंगळवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आल्याने आता औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे.
कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या समता नगरातील दोन्ही पुरूष रुग्णांचे वय 51 आणि 25 आहे. सध्या ते महानगरपालिकेच्या एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या दोन्ही रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे संदर्भीत करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. दरम्यान, हे दोघे यापूर्वी कोरोनाबाधित 38 वर्षीय काच आणि फर्निचरचे काम करणाऱ्या कारागिराच्या संपर्कात आल्याने त्यांना बाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आता औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. यातील 15 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले असून 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Tagged