कोरोनाचा देशात चौथा बळी : देशात १७२ करोनाबाधित रुग्ण

आरोग्य देश-विदेश
Spread the love

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

देशातील करोना संक्रमित मृत्यूंची संख्या आता चार वर पोहचली अाहे. गुरुवारी पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला. या अगोदर दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात  प्रत्येकी एक करोनाचा बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली. इकडे महाराष्ट्रात आज दोन नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले असून आकडा ४९ वर पोहोचला आहे. देशात आत्तापर्यंत करोनाबाधित १७२ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. करोनामुळे आत्तापर्यंत देशात चार जणांनी आपले प्राण गमावले असले तरी १४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. उपचारानंतरदेखील या रुग्णांचा फॉलोअप आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात येतोय. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूच्या संक्रमणानं आत्तापर्यंत ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार हरएक प्रयत्न
करताना दिसत आहे.

Tagged