आज पहाटे निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना दिली फाशी : देशभरात समाधान व्यक्त

क्राईम देश-विदेश
Spread the love

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी आज शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवले आहे. कोर्टाने सगळ्या आरोपींच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या . त्यामुळे चारही आरोपींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला होता . मुकेश सिंग (वय३२), पवन गुप्ता (वय-२५),
विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी आरोपींची नावे आहेत. पवन गुप्ता आणि अक्षय सिंग या दोघांनी केलेल्या याचिका फेटाळून लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे निर्भयाच्या
दोषींना उद्या फासावर लटकवले जाणार हे निश्चित झाले . त्यानुसार आज सकाळी पहाटे ५;३० ला चारही आरोपीना फासावर लटकावले. त्यानंतर त्यांना डॉ. मृत्य घोषित केलं आहे. हा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर अखेरीस माझ्या मुलीला उद्या न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे.
निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. २०१२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर जनजागृतीची एक लाट देशभरात उसळली होती. तसेच अनेक अशी प्रकरणे बाहेर आली होती जी तोपर्यंत बाहेर येऊ शकली नाहीत. मुंबईतल्याही काही प्रकरणांना याच प्रकरणामुळे वाचा फुटली. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभे राहिले होते. ज्याची व्याप्ती दिल्लीत सर्वात मोठ्या प्रमाणावर होती. गेल्या सात वर्षांपासून मी निर्भयाच्या दोषींना फाशी व्हावी यासाठी लढा दिला. उद्या चारही दोषींना फाशी होते आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे.

Tagged