कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिंद्रुड चे सलून बंद  सर्व दुकान चालकांचा एकमुखी निर्णय 

ई पेपर देश-विदेश बीड
Spread the love

 

दिंद्रुड प्रतिनिधी

 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिंद्रुड येथील नाभिक संघटनेने येत्या २९ मार्च पर्यंत आपापली सलून बंद ठेवत व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे जाहीर करत आपआपली सलुन बंद केली.

 

सलुनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस चे संक्रमण होण्याचा धोका जास्त असल्याचा सोशल मिडियावर प्रसार करण्यात येत आहे, दिंद्रुड च्या सलुन चालकांनी दाढी व कटिंग साठी ग्राहकांनी हाथ रुमाल सोबत आणण्याचे अवाहन केले परंतु म्हणावासा प्रतिसाद ग्राहकांकडून न मिळाल्याने शेवटी ११ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अशोक राऊत,अशोक सिरसे, चंद्रकांत सिरसे, महादेव देवकर,पमा चोपडे, प्रकाश वकरे, विजय सिरसे, अनिल खाडे,बळीराम राऊत, बालाजी सिरसे आदींनी घेतला असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.

 

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून दिंद्रुड ची ओळख आहे. काल गुरुवारी सायंकाळी पासुन पान टपरी, कटिंग सलुन सह दिंद्रुड येथिल प्रसिद्ध साई रेस्टॉरंट हाॅटेल ११ दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत. पुणे-मुंबई हुन हजारोंचा लोंढा दिंद्रुड कडे येत असल्याने हि खबरदारी घेतली गेली आहे.