उन्हाळ्यातील उपयुक्त आहार

आरोग्य औरंगाबाद
Spread the love

उन्हाळा सुरू होताच आपल्याला आईस्क्रिम, शेक, डिजर्ट आणि विशेष म्हणजे फळांचा राजा आंबा खाण्याची इच्छा होते. मात्र उन्हाळ्यात आपण काय खायला हवं, याची योग्य निवड करायला हवी. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं,
त्यामुळे आपण आपल्या शरीरासाठी योग्य असे पदार्थ खात आहोत याची दक्षता बाळगायला हवी, चवीनं खाऊ नये. उन्हाळ्यात काय खाऊ नये उन्हाळ्यात तळलेले, मैद्याचे पदार्थ भरपूर तूप आणि साखर घातलेली मिठाई मिठाई
बनवताना त्यात ड्राय फ्रूट्स घालणं टाळा, केक आणि इतर बेकरी उत्पादनं, कार्बन डायॉक्साईयुक्त पेय मांसाहार आम्लयुक्त असतं त्यामुळे असे पदार्थ. या पदार्थांच्या सेवनानं होणारी असिडीटी टाळण्यासाठी सोबत क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करा उन्हाळ्यात काय खावं मिक्स ग्रीन सलाड, लेट्युससारखे हायड्रेटिंग पदार्थ ज्यात 94 टक्के पाणी असतं ज्यामुळे ते पचण्यास हलकं असतं असे पदार्थ खाल्ल्यानं कमी कॅलरीजमध्ये तुमची भूक भागते
आणि वजनदेखील कमी होतं. कलिंगड, स्ट्रॉबेरीज, अननस आणि बेरीज यात 92 टक्के पाणी असतं संत्री, रास्पबेरीज, सेलेरी, हिरवी सिमला मिरची, काकडी यात पाणी तर असतं शिवाय व्हिटॅमिन सी आणि कॅफीक अॅसिड असतं, हे दोन्ही घटक त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतं. भाज्या आणि डाळींपासून बनवलेलं सूपही तुम्ही पिऊ शकता.

Tagged