परदेशात राहणाऱ्या २७६ भारतीयांना करोना व्हायरसची लागण

आरोग्य देश-विदेश
Spread the love

नवी दिल्ली : साथी ऑनलाईन

 

परदेशात राहणाऱ्या २७६ भारतीयांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. यात २५५ जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये पाच जण आहेत. लोकसभेमध्ये बुधवारी ही माहिती देण्यात आली. लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली. एकूण २७६ भारतीयांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. त्यात २५५ जण इराणमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये पाच जण आहेत. हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत राहणाऱ्या प्रत्येकी एका भारतीयाला कोरोनाची लागण झाली आहे.

Tagged