लष्कराकडून ९० कोर्सेसना स्थगिती

देश-विदेश राजकारण
Spread the love

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्णय घेतले जात आहेत. भारतीय लष्करही त्यात मागे नाही. भारतीय लष्करानेही विविध ९० प्रकारच्या कोर्सेसना स्थगिती
दिली आहे. लष्कराशी संबंधित प्रशिक्षण देणारे हे कोर्सेस आहेत. ज्यांना स्थगिती देण्यात आली आहे. लष्कराने हा मोठा निर्णय घेतला आहे. या कोर्समध्ये जास्तीत जास्त जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र करोनाची
दहशत लक्षात घेऊन आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे ९० प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस पुढे ढकलण्यात आले आहेत .

Tagged