श्रीमती शांताबाई जेथलिया यांचे दुःखद निधन

औरंगाबाद
Spread the love

औरंगाबाद/प्रतिनिधी

औरंगाबाद येथील नामांकित ॲड.स्व.रतनलालजी जेथलिया यांच्या पत्नी आणि पुणे येथील सुप्रसिध्द बिल्डर अरुण जेथलिया, औरंगाबाद येथील जेथलिया कन्स्ट्रक्शनचे प्रकाश जेथलिया आणि सुनिल जेथलिया यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई रतनलाल जेथलिया यांचे मंगळवारी पुणे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज बुधवार दि. 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता कैलासनगर स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्ययात्रा त्यांचे राहते घर रेवा रेसीडेन्सी, सोधी हॉस्पिटल जवळ, उस्मानपुरा येथुन निघेल. मृत्यू समयी त्यांचे वय (81) वर्ष होते. त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावु स्वभावाच्या होत्या. परतूर येथील माजी आ. सुरेश जेथलिया आणि परभणी येथील प्रसिध्द ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गोवर्धन जेथलिया यांच्या त्या वहिनी होत्या. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक मराठवाडा साथी परिवार जेथलिया कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.