पाहा; एमआयएम नगरसेवकाला उचलबांगडी करून काढले सभागृहाबाहेर

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद/ प्रमोद अडसुळे
महापालिकेने शहरात कचरा संकलनाचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीचा कचऱ्याच्या वजनात माती, दगड भरून वजनावर पैसे लाटण्याचा प्रकार शनिवारी सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी उघडकीस आणला होता. याचे तीव्र पडसाद बुधवारी आयोजित मनपा सर्वसाधारण सभेतही उमटले. रेड्डी कंपनीला ब्लॅकलीस्टेड करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक रावसाहेब आम्ले व विरोधी एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी केली. यासाठी जबाबदार असलेल्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना निलंबित करण्याची मागणी करत एमआयएम नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला. पाहा व्हिडीओ….

Tagged