साईदीप हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्र उपचार विभाग सुरू

आरोग्य कोकण
Spread the love

अहमदनगर – साथी ऑनलाईन

आपल्या उत्कृष्ठ आरोग्य सेवेसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोईसुविधानी युक्त सुसज्ज नेत्र उपचार विभाग सुरू करण्यात आला असून या नेत्र विभागाचे उदघाटन साई दिपचे चेअरमन डॉ. एस.एस.दीपक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या वेळी डॉ. आर.आर.धूत, डॉ. वसंत कटारिया, डॉ. रवींद्र सोमाणी,डॉ. व्ही.एन.देशपांडे, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. प्रतीक कटारिया, डॉ. गणेश सारडा,. चैत्राली सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवार व्यतिरिक्त रोज सकाळी ११ ते ८ वेळेत नेत्र विभागाचे काम सुरू राहणार असल्याची माहिती नेत्रतज्ञ डॉ. प्रतीक कटारिया व डॉ. गणेश सारडा यांनी सांगितले. साईदीप मधील अन्य उपचार सुविधा प्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वतंत्र सुसज्ज विभाग सुरू झाला आहे.
डॉ .प्रतीक वसंत कटारीया यांनी मुंबई येथून तर डॉ .गणेश सारडा यांनी मिरज येथून शिक्षक पूर्ण केले आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *