गुलेल खेळाला राष्ट्रीय खेळ घोषित करा :दोन महिन्यात निणर्य घ्या – औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खेळ जगत
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

भारतीय गुलेल खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित करावे, या अाशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या.हक आणि न्या. गव्हाणे यांच्या पीठा समोर सुनावणीस आली असता न्यायालयाने क्रीडा मंत्रालय भारतसरकार यांना दोन महिन्यात यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले.
भारतीय गुलेल संघाचे सचिव लवकुमार जाधव यांनी संघाचे वकिल अशोक तपसे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुनावणीस आली असता. खंडपीठाने वरील निर्णय दिला. या िनर्णयासंदर्भात सचिव जाधव यांनी आनंद व्यक्त करून सांगितले की, भारतीय गुलेल संघ २०१५ पासून भारतामध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेत आहे. तसेच अांतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत आहे. हा खेळ भारताचा पारंपारिक खेळ असून त्याची सुरूवात भारतापासून झाली आहेे. आजघडीला ११३ पेक्षा जास्त देशामध्ये हा खेळ खेळला जातो. २०१८ साली इटली देशामध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धैत भारतासह २२ देशांनी सहभाग घेतला होता.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *