न्यूझीलंडचा दुसऱ्या कसोटीतही विजय : वनडे नंतर कसोटी मालीकेतही भारतावर व्हाईट वॉश ची नामुष्की

खेळ जगत देश-विदेश
Spread the love

ख्राईस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडनं ७ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे . न्यूझीलंड संघाने भारताला कसोटी मालिकेतही व्हाईट वॉश देत आपलं वर्चस्व गाजवलं आहे. भारतीय संघला वनडे आणि कसोटी या दोन्ही मालिकेत व्हाईट वॉश चा सामना करावा लागला आहे. भारतानं न्यूझीलंडला पहिल्या डावात २४२ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत भारतीय गोलंदाजणी गुंडाळल होत. भारताकडे नाममात्र ७ धावांची आघाडी होती. भारतीय फलंदाजणी मात्र दोनही सामन्यात पार निराशा केली. भारताच्या एकही प्रमुख फलंदाजाना साजेशी खेळी करता आली नाही. दुसऱ्या डावात विराट कोहली १४ धावांवर ग्रँडहोम चा शिकार ठरला. तर राहणे ९ धावांवर नील चा शिकार ठरला. भारताने आजच्या दिवसाची सुरवात करताना हनुमा विहारी आणि पंत हे खेळात होते. त्यानंतर विहारी ९ आणि रिषभ पंत ४ धावांवर माघारी परतले. त्यानंतर शमी, बुमराह यांना झटपट बाद करत न्यूझीलंडने भारताचा दुसरा डाव १२४ धावांवर संपवला. न्यूझीलंडच्या सलामीच्या फलंदाजणी मात्र दुसऱ्या डावाची चांगली सुरवात केली. लेथम ५२ आणि टॉम ब्लंडलनं ५५ या दोगांनीही अर्धशतकीय खेळी केली.  लेथम ला उमेश यादवने माघारी धाडसले तर ब्लंडलनं ५५ धावांवर बुमराह चा शिकार ठरला. भारताला न्यूझीलंड ने ७ गाडी राखून सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे भारतावर वनडे पाठोपाठ कसोटीतही व्हाईट वॉश ची नामुष्की ओढवली आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *